“करिश्माच्या या गोष्टी त्रासदायक…”, बहिणीबद्दल करिनाचा खुलासा!

kareena kapoor

Kareena Kapoor | बॉलीवूडमधील प्रसिद्ध बहिणींची जोडी करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) दोघींनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले असले तरी त्यांनी आजवर कधीही एका चित्रपटात एकत्र काम केले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दोघी एकत्र झळकल्या होत्या. या शोच्या प्रोमोमध्ये दोघी बहिणी एकमेकांचे गुपित उघड करताना आणि धमाल मस्ती करताना दिसल्या.

सर्वात जास्त त्रास देते?

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या कार्यक्रमात कपूर बहिणी धमाल केली. या शोमध्ये दोघींची घट्ट नाळ आणि त्यांच्या गप्पांचा खुमासदार अंदाज दिसून आला. कपिल शर्मा (Kapil Sharma) करीना कपूरला विचारतात की करिश्माची अशी कोणती सवय आहे जी तिला सर्वात जास्त त्रासदायक वाटते. त्यावर करीना उत्तर देते की, “ही तयार होण्यास खूप वेळ घेते.” तिच्या या उत्तरावर सगळे हसून लोटपोट झाले.

सैफ, तैमूर आणि जेह यापैकी सर्वात खट्याळ कोण?

शोमध्ये कपिल शर्मा करीना कपूरला एक मजेदार प्रश्न विचारतात. तो म्हणजे, तिचे पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि मुलगे तैमूर (Taimur) व जेह (Jeh) यांच्यापैकी सर्वात खट्याळ कोण आहे? यावर करीना खूप मजेशीर उत्तर देते, “तुम्हाला माहिती आहेच, किती वेळा शोमध्ये आलात!” तिच्या या उत्तराने स्टुडिओतील प्रेक्षक आणि कपिलसह सगळेच हसून लोटपोट झाले.

करीना ने सैफला तिच्या नावाचा टॅटू करण्यास सांगितले होते?

शोच्या प्रोमोमध्ये पुढे कपिल शर्मा करीना आणि सैफच्या नात्याबद्दल एक किस्सा सांगतो. कपिल म्हणतो की, त्याला करीना आणि सैफच्या रिलेशनशिपची खात्री तेव्हा पटली, जेव्हा त्याने पाहिले की सैफने आपल्या हातावर करीना चे नाव गोंदवले आहे. यावर करीना अगदी सहज हसून म्हणते, “अहो, मीच सांगितलं होतं त्यांना टॅटू करायला. अरे, जर माझ्यावर प्रेम करत असाल, तर माझं नाव लिहाल ना!” तिच्या या उत्तरावर पुन्हा एकदा सर्वजण हसले.

News Title : Kareena Kapoor talks about karishma

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .