Kareena Kapoor | बाॅलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पापराझीकडून करिना कायम कॅमेऱ्याद कैद होत असताना दिसत असते. शिवाय करिना अनेकवेळा स्पाॅट देखील होत असताना पहायला मिळते. सोशल मीडियावर करिनाची जबरदस्त फॅन फॅालोइंग सुद्धा आहे. चाहत्यांसाठी करिना फक्त तिचेच नाहीतर मुलं तैमूर आणि जेह यांचे देखील फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान करिना कपूरने मोठा मुलगा तैमूर अली खानबदल पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाली करिना?
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान दोघांनी सुद्धा, नेपोटिजम ते स्टारकिड आणि बॉलिवूडमधील संधी अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. या सोबतच करिनाने तैमूरच्या आयुष्याबदल देखील आपलं मत मांडलं आहे. या वेळेस करिनाने तैमूरच्या करियरबदल भाष्य करत असताना करिना म्हणाली की, तैमूरला अभिनय करायचा नाही.
शिवाय तो स्वतः देखील अभिनय करणार नाही. त्याला गिटारिस्ट व्हायचं आहे आणि त्याला अर्जेंटिनाला जावं वाटतं कारण त्याला फुटबॉलपटूही व्हायचं आहे. पुढे ती म्हणाली की, “तैमूर सध्या चांगल्या फुटबॉलर पैकी एक आहे. त्याला मेस्सी बनायचं आहे, असं करिना कपूर खान म्हणाली आहे. (Kareena Kapoor) तिने आगामी प्रोजेक्टबाबतही भाष्य केलं आहे.” या वेळी अभिनेता आणि पती सैफ अली खानने देखील मत मांडलं.
जनता स्टारकिड बनवते-
बाॅलिवूडमध्ये होत असलेल्या नेपोटिझनमबाबत सैफ अली खानाने वक्तव्य केलं. या वेळी तो म्हणाला की, “आम्हाला लोकांचे अटेंशन नको आहे. आम्ही आमच्या मुलांना स्टारकिड बनवत नाहीत. आम्ही केवळ मुलांना जन्माला घालतो. त्यांना स्टारकिड मीडिया, फोटोग्राफर्स आणि जनता स्टारकिड बनवते. जनता स्टारकिडला पाहू इच्छित असते. लोकांच्या मनात असते की, हा मोठ्या स्टारचा मुलगा आहे. ”
View this post on Instagram
पुढे बोलत असताना सैफ अली खान म्हणाला की, “सोशल मीडियावर जनता जास्त इंटरेस्ट घेत असते. शिवाय त्यांचे सातत्याने फोटो घेतले जातात. त्यांना सोशल मीडियावर फॉलो केलं जातं. यातील कोण उद्या सिनेमा बनवण्यासाठी इच्छुक असेल तर ते काही रॉकेट सायन्स नाही. कोणालाही सिनेमा बनवू, असं वाटू शकतं. तुम्हाला ठरवावं लागेल, यांना प्रतिसाद का आणि कुठून मिळतोय”.
News Title : kareena kapoor talks about son taimur ali khan
महत्त्वाच्या बातम्या-
‘एक दिवस जायचा टपकून वर, त्याचं वय झालंय’; जरांगेंनी भुजबळांना सुनावलं
खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!