बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

मुंबई | अभिनेत्री करीना कपूरने तिच्या पहिल्या आणि दुसऱ्या गरोदरपणावर एक पुस्तक लिहीलं असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. या पुस्तकामुळे करीना सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र करीनाचे हेच पुस्तक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अशातच आता करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीना कपूरच्या फॅनपेजवरून करीना तिच्या मुलासोबत खेळताना दिसत असल्याच्या फोटो शेअर करण्यात आला आहे. जेहचा फोटो समोर येताच चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर करीनाचा मोठा मुलगा तैमुर आणि जेह एकसारखे दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.

करीनाने जेहच्या जन्मापासूनच त्याला मीडियापासून दूर ठेवलं आहे. तर त्याचा कोणता फोटोही समोर आला नव्हता. यातच आता या फॅन पेजचा दावा खरा असेल तर करीना आणि जेहचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर आला आहे.

दरम्यान, करीनाचं पुस्तक ‘प्रेग्नन्सी बायबल’ 9 जुलै रोजी प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे आपलं तिसरं बाळ असल्याचं करिनानं म्हटलं आहे. तिनं सोशल मीडियावर पुस्तकाचं प्रमोशन करत असतानाच वेगवेगळ्या पोस्ट केल्या होत्या. या पुस्तकात तिच्या खासगी आयुष्याचा उल्लेख आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

महाविकास आघाडीत कुरघोडी सुरुच, सरकारमधील 8 आमदार नाराज

“सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?”

शासकीय वाहने मिळूनही अधिकाऱ्यांनी घेतला वेगळा वाहन भत्ता; पुणे पालिकेला लाखोंचा भुर्दंड

‘माझे नेते अमित शहा, नरेंद्र मोदी’; पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले….

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More