बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

मुंबई | बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर रामायणातील सीतेची भूमिका करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. करीनानं एका पौराणिक चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. या चित्रपटात ती भगवान श्री राम यांची पत्नी सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. त्यामुळे चाहते तिच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. ट्विटरवर करीनाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

करीनाला सीतेची भूमिका दिल्यास चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची ताकीद युझर्सनी दिली आहे. आता या वादात बजरंग दलानं देखील उडी घेतली आहे. जर का या चित्रपटात करीना कपूर झळकली तर या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे.

नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करीनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिलं आहे. जर करीना कपूरला घेऊन हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला गेला तर आम्ही त्याच्यावर बंदी घालू असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. शिवाय आपल्या निवेदनात त्यांनी करीनाचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटो देखील दिले आहेत.

दरम्यान, हिंदू धार्मियांच्या भावना दुखावण्याचे काम यापूर्वी करीना आणि सैफअली खानने केले आहे. त्यामुळे सीता अशा पवित्र भूमिकेसाठी करिना कपूर खान योग्य नाही. आमच्या इशा-यानंतरही करीना कपूरसोबत हा सिनेमा बनवला गेला तर नक्कीच त्याचा विरोध केला जाईल. असं बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यानी मीडियाशी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन- पंकजा मुंडे

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

‘…अन्यथा रस्त्यावर उतरू’; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

शिवसेनेचा वर्धापन दिन कशा पद्धतीने साजरा होणार?; अनिल परब यांनी दिली माहिती

‘….तर काँग्रेस पक्ष आडवा येईल’; भाई जगताप यांचा शिवसेनेला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More