Top News

…मग नका जाऊ स्टार किड्सचे चित्रपट पहायला, करिना कपूर खानचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी घराणेशाहीवर आरोप केलेत. त्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा फार चर्चेत आला. सोशल मिडीयावरही सुशांतच्या चाहत्यांनी या मुद्द्याला उचलून धरत अनेक स्टार किड्सना ट्रोल केलंय. याचसंदर्भात आता कपूर कुटुंबाची मुलगी आणि सैफ अली खान याची पत्नी करिना कपूरने मोठं वक्तव्य केलंय.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ट्विटरवर हा व्हिडीओ टॉप ट्रेंडमध्ये आलाय. या व्हिडीओत एका प्रश्नाचे उत्तर देताना करिनाने म्हटते की, “‘लोकचं स्टार किड्सचे सिनेमे पाहाण्यासाठी जातात. प्रेक्षकांनीच त्यांना स्टार केलं आहे. घराणेशाहीचा विरोध करणाऱ्यांनी लोकांवरही प्रश्न उपस्थित करायला हवा. तुम्हाला नसेल जायचं तर नका जाऊ, सिनेमा पाहण्यासाठी कोणी जबरदस्ती करीत नाही.”

करिना कपूरच्या या व्हिडीओची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. घराणेशाही विरोधात प्रेक्षकांनी करिना कपूरला खूप ट्रोल केलं. अनेक वापरकर्त्यांनी यापुढे स्टार किड्सचे चित्रपट पाहणार नसल्याचं सांगितलंय. सुशांत सिंग याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर जोरदार चर्चा सुरू झालीये.

सुशांतने 14 जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली याचा तपास सध्या सीबीआयकडून सुरु आहे. यामध्ये सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अजून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात, त्यामुळे पोपटासारखं तर बोलणारचं ना…”

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या