“हनिमूनच्या रात्री नवऱ्याने मित्राबरोबर माझा लिलाव..”; करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

Karishma Kapoor | बॉलीवुड अभिनेत्री करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये सक्रिय नाही. 90 च्या दशकात तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ केलंय. आजही तिचा चाहता वर्ग टिकून आहे.तिच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत.

अशात करिश्माने केलेल्या एका खुलाश्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. प्रोफेशनल आयुष्यात करिश्माने यशाचे शिखर गाठले असले तरी व्यक्तिगत आयुष्यात तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे.

करिश्मा कपूरचा खळबळजनक खुलासा

तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत. इतकंच नव्हे तर, अगदी लग्नानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच हनीमूनच्याच दिवशी तिच्या नवऱ्याने असं काही केलं, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

स्वतः करिश्माने याचा खुलासा केला आहे. करिश्माने (Karishma Kapoor) 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले होते.

पतीनेच केला होता करिश्माचा लिलाव?

एका मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माने तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला.’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.

करिश्माच्या या खुलाश्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. करिश्माचा (Karishma Kapoor)घटस्फोट होऊन आता बरीच वर्षे लोटली आहेत. पण तिने केलेल्या या खुलाश्यामुळे पुन्हा एकदा तिचं आणि संजयचं नातं चर्चेत आलं आहे.

News Title – Karishma Kapoor big revelation

महत्त्वाच्या बातम्या-

निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ; पाहा Video

“..तर कंगनाला राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं”; संजय राऊतांचा टोला

अजितदादांच्या आमदारांना पक्षात घेणार का? शरद पवारांना सवाल; उत्तर ऐकून चिंतेत पडालं

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! दोन दिवस भरती, ओहोटीचं सावट

राहुल गांधी एनडीएला पाठिंबा देणार? मात्र घातली ‘ही’ अट