Karishma Kapoor | 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) दीर्घकाळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. एकीकडे करिश्माने तिच्या कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे गाठले, तर दुसरीकडे तिचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच अडचणींनी भरलेलं होतं. करिश्मा कपूरचं लग्न होण्याआधी ती अभिषेक बच्चनसोबत रिलेश्नमध्ये होती. मात्र, काही कारणामुळे या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दरम्यान, करिश्माने तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या नात्याबदल खुलासा केला .
काय म्हणाली करिश्मा?
करिश्मा (Karishma Kapoor) आणि अभिषेक यांचा साखरपुडा 2002 साली पार पडला होता. आपल्या करियरमध्ये करिश्मा खूप पुढे गेली होती आणि यशस्वी देखील होती. मात्र अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करण्यात, खंबीरपणे पाय रोवण्यात व्यस्त होता. एवढंच नव्हे तर समोर आलेल्या माहितीनूसार बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थितीही त्यावेळी फारशी चांगली नव्हती.
पुढे काय घडलं?
करिश्मा (Karishma Kapoor) तिच्या करियरमध्ये खूप पुढे होती. आपली मुलीचं चांगलं भाविष्य असावं असं करिश्माची आई म्हणजेच बबिता कपूरला वाटत होतं. आणि म्हणून बबिता कपूर यांना अमिताभ आणि जया बच्चन, यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी एक ‘ॲग्रीमेंट’ करुन घ्यायचं होतं अशा चर्चा होत्या.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी अशा कोणत्याही करारावर सही करणार नसल्याचं स्पष्टपणे नाकारलं. म्हणून अभिषेक बच्चन आणि माझं नातं तुटलं. त्यानंतर मी काही काळ डिप्रेश्नमध्ये होते. नंतर 2003 साली करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केलं.
News Title : karishma kapoor on abhishek bachchan
महत्त्वाच्या बातम्या-
सलमानला मारण्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ लाखांची सुपारी; धक्कादायक माहिती समोर
महाराष्ट्र विधान परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? ‘या’ तीन भाजप नेत्यांची नावे शर्यतीत
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकराचा फोटो का दाखवला? काय आहे यामागचं कारण
बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य