Karishma Kapoor | बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. करिश्माचे चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करायचे. आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबर करिश्मा आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील अनेक वेळा चर्चेत आली होती. अशात करिश्माने केलेल्या एका खुलाशामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
माझा लिलाव केला-
मुलाखतीमध्ये बोलत असताना करिश्माने (Karishma Kapoor) तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी माझा पती संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर देखील त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.
अभिषेकसोबत करिश्माचा साखरपुडा-
करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न गाठबांधली होती. त्याआधी करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा केला होता, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अभिषेकसोबतचं लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत संसार थाटला.
View this post on Instagram
दरम्यान, करिश्माने (Karishma Kapoor) 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले होते.
News Title : karishma kapoor reveals about her marriage
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..
“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक
मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरियासह ‘या’ आजारांचा धोका वाढला
पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!