“हनीमूनच्या दिवशी माझ्या शरिरावर…”, करिश्माच्या खुलाशाने खळबळ!

Karishma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात बाॅलिवूडवर अधिराज्य गाजवलं. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांनी तिच्या चित्रपटाला पसंती दिली. एकीकडे करिश्माने तिच्या कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे गाठले, तर दुसरीकडे तिचं वैयक्तिक आयुष्यही तितक्याच अडचणींनी भरलेलं होतं. करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) 2003 मध्ये दिल्लीतील व्यापारी संजय कपूरसोबत लग्न केलं. दरम्यान, करिश्माने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबदल काही खुलासा केला ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

काय म्हणाली करिश्मा?

करिश्मा (Karishma Kapoor) कायम तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र, सध्या ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. करिश्माने तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला.’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.

प्रेग्नंट असताना मारहाण-

संजय कपूर याच्याकडून करिश्मा (Karishma Kapoor) कपूरला अनेकदा मारहाण करण्यात आली. हेच नाही तर ज्यावेळी ती प्रेग्नंट होती, त्यावेळी देखील तिला मारहाण करण्यात आली. ज्यावेळी लग्न झाल्यानंतर करिश्मा कपूर ही संजय कपूरसोबत फिरायला गेली होती, त्यावेळी करिश्मा कपूरची बोली त्याने लावल्याचाही आरोप करिश्माने केला.

लग्नानंतर दोघांमध्ये एवढी भांडणे झाली की एकमेकांसोबत राहणं कठीण झालं होतं, परिणामी 13 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. करिश्माने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की, सासूबाईंनी मला एक ड्रेस भेट दिला होता. पण मला तो फिट होत नसल्याने मी परिधान केला नाही. त्यावेळी संजय कपूर आईला म्हणाले,”तू तिला मारत का नाही. संजयच्या या बोलण्याने मी खूप हैराण झाले होते”.

News Title : Karishma Kapoor reveled truth

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ

“ऋषी कपूरमुळे माझं आयुष्य बरबाद..”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप

‘माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे…’; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य