रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं

Sharad Pawar l आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली आहे. मात्र या सभेदरम्यान विद्यमान आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा राजकारणातील वस्तादांचा वस्ताद असा उल्लेख केला आहे.

रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यानिमित्ताने शरद पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार विरुद्ध महायुतीचे राम शिंदे यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे शरद पवारांनी राम शिंदे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार म्हणाले की, सभेसाठी 30 हजार खुर्च्या ठेवल्या होत्या, मात्र त्या देखील कमी पडल्या आहेत. मात्र शेजारी भाजप पक्षाची सभा सुरू आहे. मात्र तिथल्या मोकळ्या खुर्च्या आपण आणल्या आणि इकडे लावून टाकल्या आहेत असे म्हणत त्यांनी राम शिंदे यांच्या सभेवर टीका केली आहे. याशिवाय पवार साहेब सभेला आल्याने मी भावनिक झालो असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. मात्र येणाऱ्या 20 तारखेला एक लाखांची लीड कशी मिळेल,यासाठी आपण प्रयत्न करायचा असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar l शरद पवारांनी दिलं आश्वासन :

या सभेदरम्यान शरद पवार यांनी रोहित पवारवर मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की,1967 मध्ये मी आमदार झालो होतो, मात्र त्यावेळी मी फक्त 27 वर्षांचा होतो. मात्र पहिल्या पाच वर्षात कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रिपद माझ्याकडे नव्हतं. तसेच दुसऱ्या टर्ममध्ये देखील राज्यमंत्री तर तिसऱ्या टर्ममध्ये मंत्री झालो आणि चौथ्या टर्ममध्ये राज्याचा मुख्यमंत्री झालो.

परंतु, आता रोहित पवार देखील पहिल्या टर्ममध्ये आमदार आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही. मात्र आता कर्जत जामखेडमधून तुम्ही रोहित पवारांना निवडून दिलं तर आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवू, असं आश्वासन शरद पवार यांनी जनतेला दिलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भावी मुख्यमंत्री असू शकतात असे संकेत दिले आहेत.

News Title : Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency

महत्वाच्या बातम्या –

नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?

मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?

“ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू..”; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

“मुस्लिमांचे तळवे चाटतायेत, त्यांना खुश केलं जातंय आणि कातडी हिंदूंची सोलली जातेय”

‘मनोज जरांगे राक्षस…’; कालीचरण महाराजांची दातओठ खात सणसणीत टीका