बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं”

अहमदनगर | कर्जत जामखेड मतदार संघात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  आणि भाजप नेते राम शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा मोठ्या मताच्या फरकानं पराभव केला आहे. त्यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात शिंदे विरूद्ध पवार असं सतत चित्र पहायला मिळतं. त्यातच आता राम शिंदे यांनी रोहीत पवारांवर बोचरी टीका केली आहे.

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालं आहे. कुणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही, असा खरमरीत टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतंय, मोक्कारच बरं वाटतंय. आता सांगता पण येईना अशी फटकेबाजी राम शिंदे यांनी केली आहे.

शेजारच्या गड्याला काम दाखवलं. कशी जिरवली म्हणता, माझी तर जिरलीच नाही. पण आता जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा आता सरळी माणसं म्हणतात, की आमचीही जिरली साहेब आता, अशी तुफान टोलेबाजी राम शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, रोहित पवार हे बारामतीचे असूनही त्यांनी कर्जत जामखेडमधून निवडणूक लढले आणि त्यांना कर्जत जामखेडकरांनी आशीर्वाद देऊन आमदार केलं आहे, असं शिंदेंनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला नगरचे खासदार सुजय विखे पाटील हे देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या –

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

अन् शाहरूख खानला झाला ‘त्या’ नियमांचा फायदा! आर्यनला धीर देत शाहरूख म्हणाला…

‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’; वानखेडे-मलिक वादात आता मनसेची उडी

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

अखेर सुयश आणि आयुषी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More