26 जानेवारीला दिला जाणार ‘विकास वेडा झाला आहे पुरस्कार’!

Gold Trophy

सोलापूर | करमाळ्यात ‘विकास वेडा झाला आहे’ या उपहासात्मक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळ्यातील चार मंडल आणि कृषी अधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

करमाळ्यात राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन क्षेत्रच्या कामांची माहिती माहिती अधिकारात मागवण्यात आली होती. मात्र ती देण्यास टाळाटाळ केल्याने हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमित घोगरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 26 जानेवारीला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.