शेंगदाण्याच्या स्वरुपात हप्ते घेणं महागात, पोलिसाचं निलंबन

बंगळुरु | हप्तेखोर कशाच्या स्वरुपात हप्ते स्वीकारतील हे काही सांगता येत नाही. बंगळुरुत अशाच एका हप्तेखोर पोलिसाचं निलंबन करण्यात आलंय. शेंगदाण्याच्या स्वरुपात तो हफ्ते घ्यायचा.

कर्नाटक पोलीस दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल मंडाक्की रोज कामावर जाताना किंवा कामावरुन येताना बाजारातील शेंगदाणा व्यापाऱ्यांकडून हप्ते म्हणून शेंगदाण्यांची वसुली करायचा. एका वैतागलेल्या व्यापाऱ्याने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल केला.

डीसीपी बी. जी. थीमनवर यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. त्यानंतर त्यांनी मंडाक्की यांचं निलंबन केलं.