लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर कर्नलकडूनच बलात्कार

शिमला | लेफ्टनंट कर्नलच्या 21 वर्षीय मुलीवर एका कर्नलनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हिमाचल प्रदेशमध्ये शिमला येथे लष्कराच्या ट्रेनिंग कमांडोमध्ये तैनात असलेल्या कर्नलनं आणि त्याच्या मित्रानं हे दुष्कृत्य केलं.

कर्नलनं मला आणि वडिलांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. मॉडेलिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी मुंबईतील त्याच्या मुलीकडे पाठवा तसेच फोटो पाठवण्यासही सांगितलं. त्यानंतर लोकांची भेट घालून देतो असं सांगून एकदा घरी बोलावून घरी नेलं. दारू पाजून बलात्कार केला, अशी पीडित मुलीनं तक्रार केलीय.

दरम्यान दोघांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय.