Top News देश

‘जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात ते मनाने कमकुवत असतात’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मागील महिन्यापासून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच भाजपचे कर्नाटकचे कृषीमंत्री बी.सी. पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जे शेतकरी आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात ते मनाने कमकुवत असतात. त्यासाठी सरकारला दोष देता येणार नाही, असं बी.सी. पाटील यांनी म्हटलं आहे.  मैसूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकऱ्याकडून घेतल्या जाणाऱ्या या टोकाच्या निर्णयाला सरकारची धोरणं कारणीभूत नाहीत. फक्त शेतकरीच नाही, तर उद्योजकही आत्महत्या करून जीवन संपवतात. सर्वच आत्महत्यांना शेतकरी आत्महत्या म्हणू शकत नसल्याचं पाटील म्हणाले. याआधीही पाटील यांनी शेतकरी आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, आत्महत्या करणारे शेतकरी भेकड असतात. पत्नी आणि मुलांचा सांभाळ करू न शकणारे भेकड असतात. तेच आत्महत्या करतात. जर आपण पाण्यात पडलो आहोत तर आपल्या पोहणं आणि जिंकणं शिकायला हवं, असं पाटील म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

“जे काम ठाकरे सरकारला करायला हवं होतं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केलं”

“लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका”

“हिंमत असेल तर महावितरणाने घरगुती कनेक्शन तोडून दाखवावं त्यांना…”

“…मग शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय फरक राहिला??”

पुण्यात भाजपसाठी धोक्याची घंटा; ‘या’ कारणामुळे नगरसेवकांवर ठेवला जातोय वॉच?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या