Top News देश

देशातल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात केलं दाखल

बंगळुरू |  केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना देखील कोरोनाचा संसर्ग जडल्याची माहिती आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. (Karnataka CM B S Yediyurappa Tested Corona Positive)

माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या  उपचारासाठी दाखल होतो आहे, असं येडीयुरप्पा यांनी ट्विट करून सांगितलं आहे. युडीयुरप्पा कोरोनाची लागण झालेले देशातले दुसरे मुख्यमंत्री आहेत. या अगोदर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. (Karnataka CM B S Yediyurappa Tested Corona Positive)

माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मात्र तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी इस्पितळात उपचारासाठी दाखल होतो आहे, असं येडीयुरप्पा यांनी ट्विट करून सांगितलं आहे. (Karnataka CM B S Yediyurappa Tested Corona Positive)

 

 

दरम्यान, काल दुपारच्या सुमारस केंद्रिय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अमित शहा लवकर बरे व्हावेत यासाठी देशभरातून त्यांंच्यावर सदिच्छांचा वर्षावर केला जात आहे. यामध्ये विविध पक्षाचे राजकारणी, क्रीडापटू, मनोरंजन विश्वातले स्टार यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हनुमान गढी महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका; मुख्यमंत्र्यांची मंथरेशी केली तुलना

माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; कारण आहे अत्यंत धक्कादायक!

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला केंद्र सरकारची मान्यता, ‘या’ तारखेला होणार फायनल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या