कर्नाटक सरकार शेतकरी-अल्पसंख्याकांवरील गुन्हे मागे घेणार!

बंगळुरु | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शेतकरी, अल्पसंख्याक तसेच प्रो कन्नड समर्थकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची तयारी सुरु केलीय. 

कर्नाटक सरकारने एक सर्कुलर जारी करुन पोलिसांकडून अशा केसेसेसंदर्भात माहिती मागवली आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये सिद्धरामय्या सरकारने पोलिसांना अशाप्रकारचे तीन सर्क्युलर पाठवले आहेत. 

दरम्यान, सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. या निर्णयाच्या आडून दंगल घडवणाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपनं केलाय. तसेच हा निर्णय हिंदूविरोधी असल्याचंही म्हटलंय.