बंगळुरु | कर्नाटक सरकारला धोका असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात, मात्र आता चक्क जेडीएसचे सर्वोसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
आवश्यक नाही की कुमारस्वामींच्या शपथविधीला आलेले सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील, असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जेडीएसच्या मनात नेमकं काय आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कुमारस्वामींच्या शपथविधीला आलेले सर्व पक्ष मिळून मोदींना आव्हान देतील, असं मानलं जात होतं. मात्र विरोधकांची अजून एकी झालेली नाही, असं देवेगौडांच्या वक्तव्यामधून दिसून येतंय.
महत्त्वाच्या बातम्या –
-… अन धावत्या बसमध्येच भरला महसूल राज्यमंत्र्याचा जनता दरबार
-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा
-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!
-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?
-संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!
Comments are closed.