बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या ‘या’ युवा वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई | 18 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात होत आहे. विश्वचषका अगोदर काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट संघातील कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यु मिथून या खेळाडूंनी क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. भारतीय संघात 31 वर्षीय मिथूनने 2010 साली कसोटीमधून पदार्पण केलं होतं. अभिमन्यु मिथूनने प्रथम श्रेणींमध्ये क्रिकेट खेळताना दमदार कामगिरी केली आहे.

अभिमन्यु मिथून भारतीय संघात 4 कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 9 तर 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 गडी टिपले होते. 2010 साली वेस्टइंडिजविरूद्ध मिथूनने अखेरचा सामना खेळला होता. मात्र प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मध्ये अनेक सामने खेळले आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना 103 सामन्यांमध्ये 338 फलंदाजांना तंबूत धाडलं आहे. तर लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेट प्रकारामध्ये 205 बळी घेतले आहेत. मी आपल्या देशासाठी खेळलो हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. यातून जो मला आनंद मिळाला तो मी कधीच विसरू शकत नाही. मी निवृत्तीचा निर्णय माझ्या भविष्यासाठी आणि कुटुंबियांसाठी घेतला आहे.

दरम्यान, अभिमन्यु मिथून क्रिकेट खेळण्याअगोदर थाळीफेक पटू होता. मात्र त्यानंतर तो क्रिकेटकडे वळला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराजझर्स हैदराबाद या संघाकडून खेळताना त्याने 16 सामन्यात 7 बळी टिपले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“यांची काय औकात, तिकडं त्यांना कोण विचारतंय, उद्या सगळ्यांचा भांडाफोड करणार”

सुवर्णसंधी! इस्रोकडून पाच दिवसांचा मोफत सर्टिफिकेशन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

“अजित पवारांसारखा झुंजार नेता घाबरणार नाही, टोळधाड व्याजासकट परत करू”

‘पाया पडतो पण रिषभपासून दूर राहा’; नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ‘या’ अभिनेत्रीला ट्रोल

“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं आमच्या भगिनी कधीही लाचार होणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More