बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी!; बिअरच्या किमतीत मोठी वाढ

Beer Price Hike l पब (Pubs) आणि पार्ट्यांमध्ये (Parties) बिअरचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कर्नाटकात (Karnataka) बिअरच्या किमतीत मोठी वाढ (Price Hike) करण्यात आली असून, २० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे बिअर पिणे आता महाग झाले असून, खिसा रिकामा होण्याची वेळ आली आहे. बिअरच्या ग्लासने चिअर्स (Cheers) करण्याची मजा आता थोडीशी बिघडणार असून, जड अंतःकरणाने बिअरचा ग्लास उचलावा लागणार आहे.

कर्नाटक सरकारचा निर्णय; बिअर १० ते ४५ रुपयांनी महागली :

कर्नाटक सरकारने बिअरच्या किमतीत १० ते ४५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. वेगवेगळ्या ब्रँडसाठी (Brands) ही वाढ वेगवेगळी आहे. या निर्णयामुळे कर्नाटकात बिअरच्या विक्रीत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा बिअर शॉप चालक (Beer Shop Owners) आणि पब मालकांवरही (Pub Owners) नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण एका अहवालानुसार, त्यांना आधीच व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Beer Price Hike l बिअरचे उत्पादनही घटण्याची शक्यता :

कर्नाटक हे बिअर उत्पादनात (Beer Production) देशातील आघाडीचे राज्य आहे. प्रत्येक ६५० मिली बिअरमागे १० ते ४५ रुपयांची वाढ केल्याने, बिअरची विक्री कमी होऊन त्याचे उत्पादन देखील कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचा व्यवसायावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पादन शुल्कात वाढ; महसूल वाढवण्याचा प्रयत्न :

कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर, १०० रुपयांच्या बिअरच्या बाटलीची किंमत आता १४५ रुपये होईल. त्याचप्रमाणे, २३० रुपयांची बाटली २४० रुपयांना मिळेल. कर्नाटक सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) १८५ वरून १९५ टक्के केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलातील (Revenue) तूट भरून काढण्यासाठी किमती वाढवण्यात आल्याचा दावा कर्नाटक सरकार करत आहे. मात्र, याचा परिणाम व्यवसायावर अधिक होण्याची चिन्हे आहेत. कारण अचानक झालेली दरवाढ ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवणारी आहे. त्यामुळे ग्राहक बिअर खरेदी करताना अधिक विचार करण्याची शक्यता आहे, परिणामी बिअरची मागणी घटू शकते.

News Title: karnataka-government-hikes-beer-prices-sales-may-dip