बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्नाटकमध्ये हायअलर्ट जारी! पुनीत राजकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

बंगळुरू | आपल्या अभिनयानं सिनेजगतावर राज्य करणारा प्रसिद्ध आभिनेता पुनीत राजकुमार यांचं आज निधन झालं आहे. छातीत दुखत असल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर चाहते मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या ताऱ्याला बघण्यासाठी गर्दी करत आहेत. परिणामी कर्नाटक सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून प्रशासनावा योग्यरित्या परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत. राजकुमार यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं बोम्मई म्हणाले आहेत. चाहत्यांच्या भावना अनावर होवून परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यानं कर्नाटकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा राजकुमार यांना वाचवण्यात यश मिळालं नाही. परिणामी या वृत्तानं त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आपल्या चतूरस्त्र अभिनयाच्या जोरावर राजकुमार यांनी कन्नडचा पावरस्टार बनले होते. त्यांच्या जाण्यानं कन्नड चित्रपटसृष्टीसह समग्र सिनजगताचं मोठं नुकसान झालं आहे. पुनीत राजकुमार हे अवघ्या 46 वर्षांचे होते.

दरम्यान, कर्नाटक सरकार आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना भावूक झालं आहे. पुनीत यांनी 30 पेक्षा अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानी कन्नड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“पाच वर्षात तुम्ही किती काळ परदेशात राहिलात याचा हिशोब द्या”

‘तो एक तेजस्वी तारा होता’; अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली

“नवाब मलिक बोलतात ती वस्तुस्थिती असेल तर…”

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दणका

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More