Top News महाराष्ट्र मुंबई

हा घ्या पुरावा! कर्नाटकातल्या सीमा भागांमधील मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

मुंबई | कर्नाटकातल्या सीमा भागांमधले मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून सादर केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने 50 वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा 35 मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो.

दरम्यान,  सीमाप्रश्नाबाबत 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृकश्राव्य स्वरुपातील हा दस्तऐवज सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन, कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करुन तयार केलेला हा माहितीपट आहे.

थोडक्यात बातम्या-

“धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केली त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील”

व्वा लय भारी! अर्धवट जळालेल्या बिडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरीचा छडा

चावटपणा करणाऱ्याची फक्त चौकशीच नाही तर त्याला आत टाका- गुलाबराव पाटील

“भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा आपल्या कुटुंबाने पक्षाचं काम केलं”

‘देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या