देश

काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट!

बंगळुरू |  टी-ट्वेन्टीच्या खेळाप्रमाणे आकडेवारी बदलत जावी तशी कर्नाटकची बदललेली आकडेवारी आणि भाजपने केलेली सत्तास्थापना सगळ्या देशाने पाहिली. मात्र यानंतर आता हळूहळू नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. येडीयुरप्पांकडे मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी 700 कोटी रूपये मागितले मात्र त्यांनी मला 1 हजार कोटी रूपये दिले आणि मी त्यांना पाठिंबा दिल्याचा गौप्यस्फोट अपत्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी केला आहे.

काँग्रेसचं सरकार पाडून येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं. कुमारस्वामी सरकारमधील 17 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसचं सरकार पडलं. या 17 आमदारांपैकीच नारायण गौडा हे देखील आमदार आहेत. ते कर्नाटकातील गर्भश्रीमंत आमदार म्हणून ओळखले जातात.

युडीयुरप्पा यांनी दिलेले 1 हजार कोटी रूपये मी माझ्या मतदारसंघासाठी खर्च केल्याचा दावा नारायण गौडा यांनी केला आहे.

दरम्यान, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी त्यांना निधी मागितला होता. मात्र त्यांनी मला मी मागितलेल्या निधीपेक्षा 300 कोटी रूपये अधिक देण्याचं आश्वासन दिलं. मग अशा नेत्याला पाठिंबा दिला तर बिघडलं कुठं? असं नारायण गौडा म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या