एक देश आणि एकच ध्वज, केंद्रानं कर्नाटकची मागणी फेटाळली

बंगळुरु | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची स्वतंत्र ध्वजाची मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावलीय. राज्यघटनेत याप्रकरणी कुठलीही तरतूद नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्रालयानं दिलंय. 

कर्नाटक राज्याचा एक ध्वज आहे, जो जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, पण सरकारचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र आपला एकच देश आहे आणि एकच ध्वज आहे, असं गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

दरम्यान, राज्याची वेगळी ओळख असावी, यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं स्वतंत्र ध्वजाची मागणी केली होती.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या