कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा, ८ हजार १६५ कोटींची पीककर्जमाफी

बंगळुरु | काँग्रसेने पंजाबपाठोपाठ कर्नाटकमध्येही शेतकरी कर्जमाफी दिलीय. कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या ८ हजार १६५ कोटी रुपयांचं पीक कर्ज माफ करण्यात आलंय.

तसंच सहकारी बँकांकडून घेतलेलं ५० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही घोषणा केलीय.

राज्याच्या तिजोरीवर भार पडत असला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणं आमचं कर्तव्य असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलंय. या निर्णयाचा कर्नाटकातील २२ लाख २७ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या