…ती दृश्यं सिनेमातील, करणी सेनेच्या नेत्याचा अजब दावा

मुंबई | करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी लहान मुलांची बस फोडली नाही तर ती दृश्यं सिनेमातील असल्याचा दावा करणी सेनेच्या मुंबई अध्यक्षांनी केलाय. अजयसिंग सेनगर असं त्यांचं नाव आहे. 

‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हरियाणाच्या गुरुग्राममध्ये शाळकरी मुलांच्या बसला लक्ष्य केलं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. 

दरम्यान, टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झालेल्या अजयसिंग सेनगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. आम्ही राज्यघटना मानत नाही, असंही ते या चर्चेत म्हणाले.