धुडगूस घालणाऱ्या करणी सेनेला सत्ताधारी भाजपचा आशीर्वाद?

नवी दिल्ली | पद्मावत सिनेमावरुन करणी सेनेचा देशात धु़डगूस सुरु आहे, मात्र त्यांच्या या कारवायांना भाजपची मूक संमती आहे का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

भाजपची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे त्याच राज्यांमध्ये करणी सेनेची धुडगूस सुरु आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये या वादाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटताना पहायला मिळत आहेत.

दरम्यान, एकीकडे करणी सेनेनं कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे तर दुसरीकडे सरकारनं सिनेमागृहांना संरक्षण दिलं आहे, मात्र पंतप्रधानांसह सरकारमधील मोठी नावं या मुद्द्यावर अवाक्षरही काढताना दिसत नाहीयेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या