बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

मुंबई | अभिनेता कार्तिक आर्यन आज बी-टाऊनमधले एक मोठं नाव बनलं आहे आणि त्याने एकामागून एक अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. अशातच कार्तिक आर्यनचे सध्या वाईट दिवस सुरू झालेत असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला करण जोहरनं कार्तिक आर्यनला त्याच्या ‘दोस्ताना 2’ मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या किंग खानच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘फ्रेडी’मधून बाहेर काढलं. त्यापाठोपाठ आता आणखी तिसऱ्या बड्या बजेटच्या चित्रपटातून सुद्धा कार्तिक आर्यनला आऊट करण्यात आलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आता फिल्‍ममेकर आनंद एल राय यांच्या एका चित्रपटातून कार्तिकला बाहेर काढल्याची बातमी समोर येत आहे. कार्तिकला बाहेर करण्यात आल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेता आयुष्यमान खुरानाची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. मात्र यावेळी मेकर्सनं याबाबत मौन सोडलं आहे आणि या मागील कारण सांगितलं आहे.

फिल्‍ममेकर आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रोडक्शननं ही बातमी खोटी असल्याचे सांगत म्हटलं की, ‘या दोन गोष्टी एकत्र करण्यात आल्या आहेत. आम्ही कार्तिक आर्यनसोबत दुस-या एका चित्रपटाबाबत भेटलो होतो. तर आयुष्मान खुरानाला ऑफर झालेला चित्रपट दुसरा आहे. कार्तिकसोबत आमची संबंधित चित्रपटाला घेऊन बातचीत चालू आहे. त्यामुळे हा रिपोर्ट तंतोतंत खोटा आहे. आम्ही अनेक कलाकारांना भेटून चित्रपटांविषयी चर्चा करतो. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही त्यांना त्या चित्रपटासाठी साइन करत आहोत.

दरम्यान, कार्तिक आर्यन आणि फिल्ममेकर आनंद राय हे एकत्र एक फिल्म करणार असल्याचं गेल्या फेब्रूवारीमध्येच जाहीर केलं होतं. कित्येकदा तर कार्तिकला आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल

कडक सॅल्युट! पोलिसांनी जखमी महिलेला 4 किलोमीटर झोळीमध्ये उचलून नेत वाचवले प्राण

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More