‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे. व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला.
कार्तिकीच्या लग्नासाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, गायिका आर्या आंबेकर आणि मुग्धा वैशंपायन यांची खास उपस्थिती दिसली.
मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला.
कुटुंबिय आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित पुण्यात कार्तिकाचा रोनित पिसेसोबत विवाह सोहळा पार पडला. लग्नाचे काही फोटो कार्तिकीची मैत्रिण आर्या आंबेकर हिने इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत.
आपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
थोडक्यात बातम्या-
सध्या राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती…- संजय राऊत
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, नाही तर…- नाना पटोले
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दानवेंची पाठराखण, म्हणाले…
आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर
‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा