Top News महाराष्ट्र मुंबई

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?- करूणा शर्मा

Photo Credit - Facebook / Pooja chavan

मुंबई | सध्या राज्यभर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजाने 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंंमदवाडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती.

या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये कथित मंत्री आणि अरूण राठोड नावाच्या तरूण संवाद साधत आहे. मात्र संजय राठोड यांनी यावर अद्यापही आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्याच सापडले आहेत. अशातच या प्रकरणात करूणा शर्मा यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात करूणा शर्मा यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही, आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे, अशी मागणी करूणा शर्मा यांनी केली आहे.

करुणा शर्मा यांनी जीवन जो सामाजिक संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर शेअर केले आहेत. या संस्थेच्या आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा करूणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा या महिलेने फेसबुकवर करुणा धनंजय मुंडे नावाचं अकाउंट आहे. या अकाउंटवर त्यांनी धनंजय मुंडेंसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार

जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी, लिहून द्या नाहीतर…

अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे

पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या