बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा धनंजय मुंडे यांची नवी घोषणा, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बीड | करुणा धनंजय मुंडे (Karuna Munde) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनं सगळीकडे चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनं राजकीय वर्तुळातही खलबतं सुरु झाली आहेत.

आज गुरुवारी करुणा धनंजय मुंडे यांनी ‘शिवशक्ती सेना’ (Shivshakti Sena) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भ्रष्टाचार रोखण्याचं काम करणार आहे, असं मुंडेंनी म्हटलं.

राज्यात हजारो कोटींचे घोटाळे होत आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढेपर्यंत मंत्री होईपर्यंत कोट्यावधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाही. यासाठीच अशा भ्रष्टाचारासाठीच माझा पक्ष काम करणार आहे, असं करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणूक लढवण्याची वेळ जर आलीच तर मी परळीमधून निवडणूक लढवेल असंही करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलं. त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्याच नव्या पक्षाची चर्चा होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

आदित्य ठाकरे दिसताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

“भाजपचं हिंदुत्व जर चोर बाजार असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व भेंडी बाजार आहे”

“मी मुस्लीम असूनही कधीच मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही,” ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

“2014 ला नरेंद्र मोदी हे उगाच निवडून आले नाहीत, भाजप हा…..”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More