बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकार परिषद घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या…

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) हे सध्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर दोन्हीकडं गाजत आहेत. सभागृहात विरोधकांना नामोहरण करणाारे धनंजय मुंडे बाहेर मात्र आपल्याच पत्नीच्या आरोपांमुळं अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी नवीन पक्ष स्थापन (New Political Party) करण्याची घोषणा केली आहे. यासोबत त्यांनी मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवशक्ती सेना या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. परळीमधील अनेक महिलांनी माझ्याशी संपर्क केला आहे. परिणामी आपण परिळीतून धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचंही करूणा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या पक्षाचा पहिला मेळावा लवकरच नगरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

आपल्या पत्रकार परिषदेमध्ये करूणा मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याकडं कोट्यावधींची मालमत्ता आहे. पण त्यांना कोणी काहीच बोलत नाही. या सर्व कारभारांना कंटाळून मी समाजाच्या हितासाठी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं करूणा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी अन्याय केल्याचा आरोप केला आहे. तर परळी मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार या माहितीनं राज्यात खळबळ माजली आहे. अजित पवार यांचं नाव त्यांनी घेतल्यानं आता परत करूणा मुंडे यांच्यामुळं पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

“…तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”

करुणा धनंजय मुंडे यांची नवी घोषणा, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More