Karuna Sharma | बीडमधील (Beed) राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी (Murder Case) वाल्मिक कराडवर मोक्का (Mokka) लावण्यात आला आहे. पीक विमा घोटाळा (Crop Insurance Scam) आणि हार्वेस्टर घोटाळ्यातही (Harvester Scam) त्याचा सहभाग दिसून आला आहे. अशातच, करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला, असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी मंत्री धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
वाल्मिक कराडविरोधात दाद मागणार
आज (गुरुवार, 6 फेब्रुवारी २०२५) वांद्रे कोर्टात (Bandra Court) पोटगीसंदर्भात सुनावणी झाली. त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दोन लाख रुपये पोटगी आणि मुलीला 75 हजार रुपये देण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. “मी कधीच आत्महत्या केली असती. मी प्रयत्नही केला होता. पण लोकांनी मला समजावलं. मुलांकडे बघण्याचा सल्ला दिला. मुलांना अमेरिकेला (America) पाठवलं जाईल, अजून गुंड जन्माला येतील, असं मला समजावलं. म्हणून मी शांत बसले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने आपल्याला मारहाण केली. चुकीचा स्पर्श केला, असा आरोप करत, याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘माझ्या गाडीत रिव्हॉल्वर टाकली होती’
“माझ्या गाडीत रिव्हॉल्वर (Revolver) टाकली होती. ती केसही मी औरंगाबाद कोर्टात (Aurangabad Court) जिंकले. मला तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचा डाव होता. पण जनतेने माझे व्हिडीओ व्हायरल केले. मीडियाने (Media) दाखवले, त्यामुळे मी वाचले,” असेही त्या म्हणाल्या.
“मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे. मी 27 वर्षे त्यांच्याशी संसार केला आहे. मी निवडणूक आयोगात (Election Commission) केस टाकली आहे. आयोगाने मुंडेंना नोटीस दिली आहे. पहिली पत्नी म्हणून माझं नाव टाकायला सांगितलं. मुलाबाळांचं नाव टाकलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. “गुंडशाही करून त्यांनी निवडणूक जिंकली. 200 बुथ कॅप्चर (Booth Capture) केले. मृतांचे मतदानही केले. माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी ते देणार आहे,” असेही करुणा शर्मा (Karuna Sharma) म्हणाल्या.
Title : Karuna Sharma Accuses Walmik Karad of Assault in Front of Dhananjay Munde