Dhananjay Munde l बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सातत्याने अडचणीत सापडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आता त्यांच्यावर थेट हल्लाबोल करत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्या म्हणाल्या, “वाल्मिक कराड (Valmik Karad) सध्या जेलमध्ये सडतोय, आता धनंजय मुंडेंचीही तीच अवस्था होणार आहे.”
“धनंजय मुंडेंचा मोठा भ्रष्टाचार” :
करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत सांगितले की, “धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि त्या हळूहळू हे प्रकरण बाहेर काढत आहेत. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने त्यांना वाचवत आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंनी आतापर्यंत 3,000 वंजारी समाजातील लोकांवर खोटे एफआयआर दाखल केले आहेत. सरकार लोकांच्या मतांचा गैरवापर करत आहे. वाल्मिक कराडने मारहाण केली, तो आता तुरुंगात आहे. लवकरच धनंजय मुंडे यांचीही तीच अवस्था होईल.”
करूणा शर्मा म्हणाल्या, “मस्साजोग प्रकरणात सुप्रिया सुळे (Supriya Sule) जसे लक्ष देत आहेत, तसेच त्यांनी मला मदत करावी. कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराडने कलेक्टर आणि मंत्री धनंजय मुंडेंसमोर माझ्यावर हल्ला केला. त्या घटनेची सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करून द्यावीत.” त्या पुढे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंनी अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मी मागणी केली आहे.”
करूणा शर्मा यांनी मोठा खुलासा करत सांगितले की, “शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला 4-5 वेळा फोन करून बोलावले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच झाला असता, पण अजित पवारांनी काहीतरी केलं आणि शरद पवारांनी मला वेळ दिली नाही,” असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही मुंडेंना वाचवण्यात हात असल्याचा दावा केला होता. आता त्यांनी अजित पवार यांच्यावरही हेच आरोप केले आहेत. या आरोपांमुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर मोठा दबाव वाढत चालला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.