Karuna Sharma l धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या नवीन गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “धनंजय मुंडेंकडे एकूण ११ मोबाईल क्रमांक आहेत, आणि त्या क्रमांकांचा सीडीआर (Call Detail Record) तपासला गेला तर अनेक गोष्टी उजेडात येतील,” असा धक्कादायक आरोप करुणा शर्मांनी (Karuna Sharma) केला आहे.
“संपूर्ण प्रकरणे बाहेर येतील” – करुणा शर्मा :
शर्मा म्हणाल्या, “हे सर्व मोबाईल नंबर माझ्याकडे आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना हे क्रमांक हवे असतील, तर मी देऊ शकते. २०२२ मध्ये मी सीबीआयमध्ये तक्रारही केली होती.” त्या पुढे म्हणाल्या, “या सर्व नंबरचा व्हॉट्सअॅप आणि सीडीआर तपासा. त्या तपासातून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.”
याशिवाय करुणा शर्मा यांनी दावा केला की, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर ‘आवादा कंपनी’ची बैठक झाली होती, आणि त्यामुळे त्यांच्यावर संशय घेण्यास वाव आहे. “मी कधीही नवऱ्याची अंध पाठराखण केली नाही. पण जेव्हा इतक्या महत्त्वाच्या बैठका त्यांच्या निवासस्थानी होतात, तेव्हा चौकशी व्हायलाच हवी,” असंही त्या म्हणाल्या.
Karuna Sharma l “मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यायला हवा होता” :
“देवेंद्र फडणवीस यांनी आजवर मला भेटीची वेळ दिली नाही. मी कितीवेळा मागणी करू? मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने मला वेळ द्यायला हवा होता,” अशा शब्दांत करुणा शर्मांनी नाराजी व्यक्त केली.
“धनंजय मुंडे यांचे सगळे काळे कारनामे या मोबाईल नंबरच्या माध्यमातूनच घडतात,” असा गंभीर आरोप करुणा शर्मांनी केला. “ते या नंबरवरून माझ्याशीही बोलले आहेत, त्यामुळे मी खात्रीने सांगू शकते की हे नंबर त्यांचेच आहेत.”