‘बीडच्या तुरुंगात असताना मी माझ्या नवऱ्यासोबत…’; करूणा शर्मांचा मोठा दावा

Karuna sharma

Karuna Sharma | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी, वाल्मीक कराड (Walmik Karad) तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) लोकांशी बोलत असल्याचा आरोप केला आहे. कराड तुरुंगात चहा-नाश्ता करत असल्याचा दावा करत, दमानिया यांनी कराडला मिळणाऱ्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या आरोपांना करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पाठिंबा दिला आहे.

करुणा शर्मा काय म्हणाल्या?

“अंजली दमानिया यांचे आरोप खरे आहेत. मी स्वतः बीड (Beed) जेलमध्ये १६ दिवस राहिले आहे, त्यामुळे दमानिया जे म्हणत आहेत, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे करुणा शर्मा यांनी सांगितले.

“मी १६ दिवस बीडच्या तुरुंगात होते. माझा नवरा माझ्यासोबत अर्धा-अर्धा तास बोलायचा. मी सहा दिवस अन्न खाल्ले नव्हते, फक्त एका सफरचंदावर होते. तरीही, मला जेलमध्ये चांगल्या हॉटेलमधून जेवण पाठवण्यात आले होते.”

“धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मला फोन करून सांगितले की, फाईव्ह स्टार हॉटेलमधून (five-star hotel) जेवण पाठवले आहे, ते खा. ते माझ्याशी अर्धा तास फोनवर बोलायचे.” “अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधांबद्दल केलेला दावा १०० टक्के बरोबर आहे,” असेही करुणा शर्मा यांनी म्हटले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

करुणा शर्मा यांनी, “धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत,” असे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंची सावली आहे. त्याच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळेच आज राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले. (Karuna Sharma)

Title :  Karuna Sharma Supports Anjali Damaniyas Allegations on Walmik Karad

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .