बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली’; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून करूणा शर्मा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिलीये. धनंजय मुंडे खोट्या तक्रारींवरून आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं करूणा शर्मांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांचे इतर अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. मी जर सीडी काढली तर संपुर्ण महाराष्ट्र हादरेल. धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांचे देखील संबंध होते. धनंजय मुंडे हे उपलब्ध पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांनी दबाव टाकल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होऊन अटकेची कारवाई करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यामुऴेच माझ्या आईने आत्महत्या केली, असा गंभीर आरोप करूणा शर्मांनी केला आहे. मी सुप्रिया सुळे यांच्याकडेही न्यायासाठी विनंती केली होती. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असं करूणा शर्मांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकलण्यात यावं अशी मागणी करूणा शर्मांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. धनंजय मुंडेंनी इतर महिलांवर दबाव टाकून गप्प केले आहे, अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘त्या’ व्यक्तीला मी Mercedes-Benz बक्षीस म्हणून देणार- नितेश राणे

मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस

“भ्रष्टाचार नष्ट करण्याचं काम आमच्या सरकारने केलंय”

राज्यसभेवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य; ‘या’ काँग्रेस नेत्याने दिला राजीनामा

“दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More