फाशीच्या दिवशीच अजमल कसाब पैज हरला!

मुंबई | तुमची न्यायव्यवस्था मला आणि अफजल गुरूला कधीच फाशी देऊ शकत नाही, अशी पैज मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबनं मुख्य तपास अधिकारी रमेश महालेंशी लावली होती.

कसाबनं पोलिस अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती दिली होती. त्यावेळी तुला फाशी होऊ शकते असं महाले म्हणाले होते. गेल्या 8 वर्षांत तुम्ही अफजल गुरूला फाशी दिली नाही, मला काय देणार, असं मग्रुरीनं कसाब म्हणाला होता. त्यावर तुला आणि अफजललाही फाशी होईल असं उत्तर महालेंनी दिलं होतं.

कसाबच्या फाशीच्या आदल्या दिवशी महाले कारागृहातील बराकीत गेले. त्यांना कसाबला फाशीसाठी तयार होण्यास सांगितलं. त्यावेळी कसाबनं पैज हरल्याचं मान्य केलं.