कसबा-चिंचवड पोटनिवडुकीबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या महाराष्ट्रात कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. ही पोटनिवडणूक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती.

या निवडणुकीबाबत सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. पोटनिवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 27 फेब्रवारीला या जागांसाठी मतदान होणार होतं. 27 फेब्रुवारीला होणारी ही पोटनिवडणूक आता 16 फेब्रुवारी असणार आहे. असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

27 फेब्रुवारीला अरुणाचल, झारंखड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या ठिकाणी देखील काही जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर त्याचवेळी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षादेखील असणार आहेत. त्यामुळं निवडणूक आयोगाने हे बदल केले आहेत.

झालेल्या बदलानुसार 31 जानेवारीला अधिसूचना काढण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. 8 फेब्रुवारीला अर्जाची छाननी केली जाईल. 10 फ्रेबुवारीला अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख असेल. 16 फेब्रुवारी रोजी दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल.

महत्त्वाच्या बातम्या