Top News अहमदनगर महाराष्ट्र

कष्टकऱ्यांची भाऊबीज हा कष्टाला प्रतिष्ठा देणार उपक्रम -राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर |  ऊस तोडणी मजूरांसाठी ‘कष्टकऱ्यांची भाऊबीज’ या उपक्रमातून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचे महत्वपूर्ण काम झाले असल्याचे समाधान भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

23 नोव्हेंबर रोजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने ऊस तोडणी कामगारांसाठी कष्टकऱ्यांची भाऊबीज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कडू पाटील होते.

ऊसतोड मजूरांना कपड्याचे वाटप विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, “राज्यात ऊस तोजणी मजूरांसाठी प्रथमच असा उपक्रम होत आहे. अतिशय लांबून येऊन कष्ट करणाऱ्या मजूरांकडून आपण हक्काने अपेक्षा करतो. पण त्यांच्या समस्यांसाठी सुद्धा आपण पुढे आले पाहिजे”.

दरम्यान, ऊस तोडणी मजूरांसाठी विमा योजना सुरु करण्याचा पहिला निर्णय विखे पाटील कारखान्याने घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक

बेफिकर लोकांमुळे निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल- राजेश टोपे

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली

अहमद पटेल यांनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली, पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या