गोळीबार केल्यामुळे लष्काराच्या विरोधात गुन्हा दाखल

संग्रहीत

श्रीनगर | दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगवण्यासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झालाय. शोपिया जिल्ह्यातील गनोवपुरा गावात झालेल्या या घटनेप्रकरणी लष्कारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करण्यात आल्याचं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

लष्कराने केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंद पुकारला आहे, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कालपासून या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.