‘कटप्पा’च्या मुलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई | बाहुबली सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. दिव्या असं तिचं नाव असून ती डॉक्टर आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात तीने काही वैद्यकीय कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

काही अमेरिकन वैद्यकीय कंपन्या मला त्यांची औषधं रुग्णांना सूचवण्यासाठी दबाव टाकत होत्या. मात्र या औषधांमुळे रुग्णांच्या दृष्टीसह त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही औषधं सूचवण्यास मी नकार दिला, असं दिव्यानं पत्रात म्हटलंय. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या