कॅटरिना कैफने दिली गुड न्यूज?; बेबी बंप लपवतानाचा नवा Video समोर

Katrina Kaif | बॉलीवुड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या आयुष्यातही नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. विक्कीने नुकताच लंडनमध्ये त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान दोघांचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लंडनच्या रस्त्यावर चालतानाचा विक्की आणि कॅटरिनाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कॅटरिनाचा बेबी बंप दिसत असल्याचं म्हटलं जातंय. दोघेही लंडनमध्ये फुल्ल धम्माल-मस्ती करताना दिसून येत आहेत.

कॅटरिना होणार आई?

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कॅटरिना ओव्हर(Katrina Kaif) साइज कपडे घालून दिसत आहे. ओव्हर साइज कपड्यांमध्ये कॅटरिना तिचा बेबी बंप लपवत असल्याचं म्हटलं जातंय. इथूनच तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.गेल्या चार महिन्यांपासून या चर्चा होत आहेत.

या व्हिडिओवर नेटकरी देखील अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरनं लिहिलंय, कॅटरिना प्रेग्नंट वाटतेय. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, हा ती प्रेग्नंट आहे. पण प्लिज त्यांना प्रायव्हसी द्या. सोशल मीडियावर या चर्चा होत असल्या तरी अद्याप कॅटरिना आणि विक्की यांनी अधिकृत अशी कोणतीच घोषणा केली नाहीये.

कॅटरिनाचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह देखील आई-बाबा होणार आहेत. अभिनेता वरूण धवन देखील बाबा होणार आहे. त्यानंतर आता विक्की आणि कॅटरिना यांच्याबाबत चर्चा होत आहेत. पण चाहते दोघांकडून याची ऑफिशिअल घोषणा होण्याची वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दरम्यान, कॅटरिना कैफ (Katrina Kaif)आणि विक्की कौशल यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघेही आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं जातंय. या व्हायरल व्हिडिओमुळे या चर्चेला उधाण आलंय. चाहत्यांकडून याबाबत उत्सुकता वाढली आहे.

News Title : Katrina Kaif Pregnancy Talks

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट तर ‘या’ भागाला अवकाळी झोडपणार

“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट

“…तर मी BJP सोडेल”, अभिनेता शेखर सुमनचं मोठं वक्तव्य

पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाच्या कबुलीने खळबळ!