बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

जयपूर | आपल्या देशात सतत रस्ते, वीज, पाणी, घर या मुद्द्यांवरून राजकारण चांगलंच रंगत असतं. अशातही राजकीय नेते आपल्या वक्तव्यांनी समस्या सोडवण्यापेक्षा वाढवून ठेवतात. राज्यातील रस्ते हे साफ आणि सुंदर असायला हवेत. मात्र, दरवर्षी वेगळंच चित्र पहायला मिळतं. अशातच आता राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. (Ashok Gehlot Government Minister Rajendra gudha Controversial statements)

राजस्थान सरकारमधील राज्यमंत्री राजेंद्र गुढा (Rajendra gudha) हे सातत्यानं वादात अडकत आलेले आहेत. आताही गुढा यांनी आपल्या कार्यकर्त्यांन संबोधित करताना एक अजब गजब वक्तव्य केलं आहे. आपल्या राज्यातील रस्ते हे कतरिना कैफच्या (Katrina Kaif) गालासारखे गुळगुळीत असायला हवेत, असं गुढा यांनी म्हटलं आहे. गुढा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सध्या जोरदार वाद पेटला आहे.

राज्यमंत्री गुढा पहिल्यांंदाच आपल्या मतदारसंघात आले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्धाटन केलं आहे. याप्रसंगी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पहिल्यांदा हेमा मालिनीच्या गालाची तुलना रस्त्यांबाबात केली. नंतर त्यांनी तेथील उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते व्हायला हवेत, अशा सुचना केल्या आहेत.

दरम्यान, अशोक गहलोत यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. राजस्थानमधील वाद संपल्यात जमा असताना गुढा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

पत्नीच्या खुलास्यानं सोलापूर हादरलं, अश्लील व्हिडीओ पाहून पती…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More