मनोरंजन

‘बाहेरचा आला नी धमकावून गेला’; ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री संतापली

मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीवजा इशाऱ्यात भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाची मागणी केली. अमेरिकेने दिलेल्या  इशाऱ्यावर अभिनेत्री कविता कौशिकने प्रतिक्रिया दिली आहे.

आपण सर्व एकमेकांना घाबरवण्यात व्यस्त होतो. तेवढ्यात बाहेरचा कोणी आला आणि कुटुंबातील सर्वात मोठ्या सदस्याला धमकावून गेला, अशा आशयाचं ट्विट कविता कौशिकने केलं आहे.

कविता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती आपली मते बिनधास्तपणे व्यक्त करताना दिसते. यापूर्वी तिने ‘रामायण’ या मालिकेवर ट्विट केलं होतं

हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर. ज्यावेळी आमच्यावर संकट कोसळलं त्यावेळी आम्हाला तुझी आठवण आली आणि आम्ही तुझ्या मालिका पाहू लागलो. नाहीतर आम्ही कायम ‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ हेच शो पाहण्यात दंग असतो, असं कविताने म्हटलं होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाऊन काही भागात शिथील करता येईल का?, पवारांची मोदींना विचारणा

“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या