बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक

पुणे | ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांनी ठेवीदारांना विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. मराठेंना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आधी प्रणव मिलिंद याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, त्यांची पत्नी नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत मराठे ज्वेलर्सच्या पौड रोड आणि लक्ष्मी रोड शाखेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. मंजिरी मराठे यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठवण्यात आली आहे.

मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या. आरोपींनी गुंतवणुकीपोटी साक्षीदार आणि इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या. मराठे ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीने आरोपी संचालकाने कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार प्राप्त असून त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एम. बी. वाडेकर यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!  

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

काळजी घ्या! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; धक्कादायक माहिती समोर

…तर मला सामनाचं काम सोडावं लागेल- संजय राऊत  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More