औरंगाबाद महाराष्ट्र

“भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष”

औरंगाबाद | भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचं मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते औरंगाबाद येथे उपस्थित होते. त्यावेळी  पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.

भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्ववादात फरक असल्याच त्यांनी सांगितलं. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी आहे. मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचं, कवाडे यांनी म्हटलं आहे.

मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पुढे विस्तार होईल, आशा जिवंत आहे, असं सुचक वक्तव्यही कवाडे यांनी केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणत असल्याचं कवाडेंनी म्हटलं आहे.

ठळक बातम्या-

“किरकोळ लोकांच्या बोलण्याचा मला फरक पडत नाही, परत बोलाल तर लोक ताणून मारतील”

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

“महंगाई जेब कांटे, भाजपा देश बांटे”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या