भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!

Maharashtra l राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक जाहीर होणार आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  कवठेमहांकाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी गटाकडून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. आता या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात देखील खळबळ उडाली आहे.

कवठेमहांकाळमध्ये भाजप- राष्ट्रवादी आमनेसामने :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण केली.

मात्र या प्रकरणाचा जाब विचारायला गेले असताना आपल्या कार्यकर्त्यांकडून एका व्यक्तीला मारहाण केल्याचे माजी खासदार संजयकाकांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता मारहाण करणाऱ्यांवर थेट कारवाई करावी या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला आहे.

Maharashtra l माजी उपनगराध्यक्षांना केली मारहाण :

कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांना माजी खासदार संजय पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईला देखील स्वत: माजी खासदार संजय पाटील  ढकलून दिले असा आरोप राष्ट्रवादी गटाकडून करण्यात आला आहे.

मात्र आता या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.

News Title – Kavthemahnkal crime news

महत्त्वाच्या बातम्या-

निक्कीच्या आईने अरबाजबद्दलची ‘ती’ गोष्ट सांगताच निक्कीला बसला मोठा धक्का!

पुण्यात बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ!

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!