बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनानंतर मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

कल्याण | फेरीवाल्यांविरोधातल्या आंदोलन प्रकरणी कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या बड्या नेत्यांना अटक करण्यात आलीय. त्यामध्ये कल्याण प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे. 

डोंबिवलीतील शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसी गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आलीय. त्यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील एकूण 12 जणांना अटक करण्यात आलीय.

दरम्यान, रेल्वे प्रशासन फेरीवाल्यांच्या डेडलाईननंतर आक्रमक होऊन स्टेशन परिसरातील स्टॉल्सची तोडफोड केली होती. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More