Kedar Jadhav | टीम इंडियाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती चाहत्यांना दिली. 39 वर्षीय केदारने 8 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने केवळ 35 धावा केल्या. या मालिकेत त्याला अवघ्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले होते. आज 3 जूनरोजी केदारने (Kedar Jadhav) आपली निवृत्ती जाहीर केली.
केदार जाधवची निवृत्ती
सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून केदारने निवृत्तीची घोषणा केली. केदार जाधवने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “माझ्या संपूर्ण कारकिर्दीत प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. 3 वाजल्यापासून मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाल्याचे मानले जाईल.” केदारच्या या पोस्टवर आता चाहत्यांकडून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
केदार जाधवने (Kedar Jadhav)2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने 16 नोव्हेंबर 2014 रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.73 एकदिवसीय सामन्यांमध्ये जाधवने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या. यावेळी त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली.
केदार जाधवची कामगिरी
यासोबतच केदार जाधवने (Kedar Jadhav) 27 बळी देखील घेतले आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय T20 करीअर बद्दल बोलायचे झाल्यास, केदारने 9 सामन्यात 123.23 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त केदार जाधव आयपीएलमध्ये देखील खेळला आहे.
View this post on Instagram
आयपीएलमध्ये केदार जाधव चेन्नई सुपर किंग्जकडून बराच काळ खेळला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादचेही प्रतिनिधित्व केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली केदार जाधवने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. IPL मध्ये 95 सामन्यात 123.17 च्या स्ट्राईक रेटने त्याने 1196 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
News Update – Kedar Jadhav retired from cricket
महत्त्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाने उचललं मोठं पाऊल!
मुंबई हादरली! मंत्रालयासमोर IAS अधिकाऱ्याच्या लेकीने उडी मारुन संपवलं जीवन
“…तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल”; निकालापूर्वीच शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बारामतीत कोण मारणार बाजी?; मतमोजणीआधीच ‘या’ नेत्याचा मोठा दावा
“..मुळेच राज्यात महायुतीला फटका?”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा